- भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धविराम झाल्यानंतरही पाकिस्तानकडून भारतविरोधातील जहाल वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाक लष्कराने बंडखोर भारताला गुडघे टेकायला लावले, पाकिस्तान जिंदाबाद!’ या ट्विटमुळे पुन्हा एकदा वादाला उधाण आले आहे.
- पाकच्या पंजाब प्रांताच्या मंत्री मरियम औरंगजेब यांनी देखील भारताविरोधात टीकेची झोड उठवली. त्यांनी म्हटले की, “ऑपरेशन बुनियान मर्सूस” च्या माध्यमातून पाकिस्तानने जगाला आपली ताकद दाखवली असून भारताच्या भ्याड वृत्तीला ठाम उत्तर दिले. तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम म्हणाला, भारताच्या आक्रमकतेला पाकिस्तानने फक्त उत्तर दिले आणि हिशेब चुकता केला.
- दरम्यान भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्धविरामानंतर शांततेचा मार्ग स्वीकारण्याऐवजी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आक्रमक वक्तव्यांची मालिका सुरू झाली आहे.
युद्धविरामानंतरही पाकिस्तानचा उन्माद कायम
