भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलग 86 तास चाललेले युद्ध आज सायंकाळी अधिकृतपणे संपले आणि दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली. मात्र, पाकिस्तानच्या विश्वासघातकी धोरणाचे दर्शन पुन्हा एकदा घडले. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर अवघ्या चार तासांतच पाकिस्तानने ती मोडली असे वृत्त आहे.
गेल्या काही तासांत जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींना पुन्हा उधाण आले आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा या सीमावर्ती भागांत तोफ गोळ्यांद्वारे जोरदार मारा केला आहे. या आक्रमक कारवायांमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात एक संशयित ड्रोन स्फोट झाला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालनवाला सेक्टरमध्येही युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे. भारताच्या लष्कराने या सर्व प्रक्षोभक कारवायांवर तत्काळ आणि कठोर प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षादलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सीमाभागांत गस्त आणि देखरेख वाढवण्यात आली आहे.