ब्रेकिंग! भारतीय सैन्याने केली पाकिस्तानची फजिती

Admin
1 Min Read
  • पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सातत्याने भारताच्या विविध भागांवर हल्ला करत आहे. 
  • या सर्व घडामोडींबाबत आज सकाळी परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्युरात केलेल्या कारवाईत सियालकोट येथील एअरबेसवर हल्ला करत त्याला उद्ध्वस्त केले आहे.
  • पाकिस्तानकडून २६ हून अधिक ठिकाणी हल्ले करण्यात आल्याचेही यावेळी कुरेशी यांनी सांगितले. पाकिस्तानकडून वारंवार भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ला करत असल्याचेही कुरेशी यांनी सांगितले. 
  • कुरेशी पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानकडून उधमपूर, भुज, भटिंडा, पठाणकोटसह ५ ठिकाणी उपकरणांचे नुकसान झाले असून, श्रीनगर, अवंतीपूर येथे वैद्यकीय संकुल आणि शाळेला लक्ष्य करण्यात आले आहे. 
  • भारतीय लष्कराचे एस ४०० आणि ब्रह्मोसचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहेत. भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित असून पाकिस्तानकडून करण्यात येत असलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे बरेच नुकसान केले आहे. परराष्ट्र सचिव म्हणाले की, पाकिस्तान खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करत असून सिरसा, आदमपूर हवाई तळांना झालेल्या नुकसानीचे दावे पूर्णपणे खोटे आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान, या एअरबेसचे फोटोदेखील दाखवण्यात आले. ज्यात ही सर्व ठिकाणे सुरक्षित असल्याचे दिसून येत आहेत.
Share This Article