देश - विदेश
बोलायचं नसतं, डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते

पाकिस्तानने भारताच्या अनेक भागांना मिसाईल आणि ड्रोनद्वारे लक्ष्य केले होते. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हवेतच नष्ट केले. सलग दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानने भारताच्या काही भागांवर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ला केला. मात्र भारताने नापाक हल्ले परतावून लावले आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दोन्ही देशांना संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एक विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
भारत-पाकिस्तान तणावावर बोलायचे नसते तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते, असे पवार म्हणाले. बारामतीत येथे त्यांनी हे विधान केले आहे.



