आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप झाला आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या निवेदनानुसार, आज पाकिस्तानमध्ये ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. केंद्रानुसार हा भूकंप दहा किमी खोलीवर झाला, ज्यामुळे परत धक्के जाणवण्याची शक्यता आहे.
कमी खोलीवरील भूकंप सामान्यतः खोल भूकंपांपेक्षा जास्त धोकादायक असतात. कारण कमी खोलीवरील भूकंपांच्या भूकंपीय लाटा पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी कमी अंतर कापतात, ज्यामुळे जमिनीला जोरदार धक्के बसतात आणि रचनांना अधिक नुकसान होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता असते.