देश - विदेश

ब्रेकिंग! पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू

  • भारत आणि पाकिस्तान दरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण झाले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर गोंधळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर अयशस्वी हल्ल्यांचे प्रयत्न होत आहेत. या दरम्यान झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांवर गोळीबार करत असताना पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.
  • काल भारतीय सीमा सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत सात दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
  • पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह-1 या क्षेपणास्त्राचाही समावेश होता. या कारवायांनंतर भारतीय सैन्याने आता ठोस प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून तीन ते चार महत्त्वाच्या हवाई तळांवर जोरदार हल्ले केले.
  • या कारवाईत रावळपिंडीजवळील नूर खान हवाई तळ हे मुख्य लक्ष्य होते. तसेच भारताने पाठविलेल्या ड्रोननी इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट घडविले आहेत. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान चांगलाच हादरला आहे.

Related Articles

Back to top button