देश - विदेश

‘पाकिस्तान जिंदाबाद’ पुण्यातील तरुणीची पोस्ट

  • पुण्यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या खदिजा शेख या विद्यार्थिनीने एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यामुळे तिला थेट जेलची हवा खावी लागली आहे. 
  • पुण्यात वास्तव्यास असलेल्या खदिजाने सोशल मीडियावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी पोस्ट शेअर केल्याने खळबळ उडाली. सकल हिंदू समाजाने ही माहिती एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी आता पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • सकल हिंदू समाजाने सांगितले की, पुण्यात शिक्षण घेणारी ही तरुणी तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहित होती. तिने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ही घोषणा शंभर वेळेस लिहिल्याचा दावा सकल हिंदू समाजाने केला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले, असे सकल हिंदू समाजाचे म्हणणे आहे.
  • याबाबतची तक्रार पोलिसामध्ये दाखल करण्यात आली. दरम्यान पुण्यातील कोंढवा पोलिसांनी खदिजाला अटक करत तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Related Articles

Back to top button