ब्रेकिंग! ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान पुन्हा हादरला

Admin
1 Min Read

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये एकामागून एक तीन स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. आज सकाळी स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. काही स्थानिक स्रोत आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये हा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. दरम्यान याची अधिकृत पुष्टी केली जात आहे.

आज सकाळी लाहोर एअरपोर्टजवळ हे स्फोट झाले. या स्फोटामुळे बऱ्याच किलोमीटरपर्यंत हादरे बसले. त्यानंतर सायरनची आवाज आली. स्फोटानंतर सर्व नागरिक इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. आकाशामध्ये धुराचे लोट पसरले होते, अशी माहिती पाकिस्तानी पोलिसांनी दिली आहे. हा स्फोट कुणी केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Share This Article