ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानवर दुसरा हल्ला

Admin
1 Min Read

पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानचा वाईट काळ सुरू झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर 7 मे रोजी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. आता बलुच आर्मीनीही पाकिस्तानवर खोलवर घाव घातला आहे. बलुच आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर आयईडीने हल्ला केला, ज्यामध्ये 12 सैनिक ठार झाले.

बलुच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने बोलानच्या माच कुंड भागात रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने मोठा स्फोट घडवून आणला. या स्फोटाद्वारे त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या वाहनाला लक्ष्य केले, ज्यामध्ये 12 सैनिकांचा मृत्यू झाला. सैनिक लष्करी कारवाईसाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला.

पाकिस्तानच्या नैऋत्य प्रांतातील बलुचिस्तानमधील कच्छी जिल्ह्यातील माच भागात सुरक्षा दलाच्या वाहनावर आयईडीने हल्ला करण्यात आला. हा हल्ला मंगळवारी करण्यात आला. पण या हल्ल्याचे फुटेज आता सोशल मीडियावर समोर आले आहेत. फुटेजमध्ये असे दिसून आले की, स्फोटानंतर वाहनात बसलेले सैनिक हवेत अनेक मीटर उडाले. सैनिकांच्या चिंधड्या-चिंधड्या उडाल्या.

Share This Article