देश - विदेश
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरनंतर पाकची भारताला धमकी

- पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी नेता मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांसह अनेक दहशतवादी मारले गेले. या पार्श्वभूमीवर, गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानकडून आलेल्या एका ईमेलमध्ये आम्ही तुमच्या स्टेडियमला उडवून देऊ, असे लिहिले आहे. या धमकीनंतर सुरक्षा एजन्सींनी तपास सुरू केलाय आणि अहमदाबादमधील स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
-
पाकिस्तानने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पाकिस्तानने धमकी दिली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.



