देश - विदेश
बिग ब्रेकिंग! पाकिस्तानचा भयंकर दावा

- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मध्यरात्री एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. पाकिस्तानमधील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 5 असे एकूण 9 दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले.
- या हल्ल्यानंतर पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार भारतीय लष्कराने केवळ दहशतवादी केंद्रेच नव्हे, तर त्यांच्या नीलम आणि नौसेरी या दोन महत्त्वाच्या धरणांवर देखील बॉम्ब टाकल्याचा आरोप केला आहे.
- पाकिस्तानी लष्कर आणि माध्यमांकडून करण्यात येत आहे. विशेषतः नौसेरी धरणाच्या परिसरात वीज निर्मिती केंद्र असल्याने याचा परिणाम संपूर्ण भागावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- पाकिस्तानने या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर आक्षेप घेत दावा केला आहे की, भारताच्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले आहे. मात्र त्याच वेळी ज्या ठिकाणी हल्ले झाले, तिथे दहशतवादी नव्हते असे सांगणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे.



