- पहलगाम येथील दहशतवादी हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात पडला आहे. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात शंभर किलोमीटर आत घुसून हल्ले केले. हे भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे खास वैशिष्ट्य. पण, भारताने पाकिस्तानच्या आत शंभर किलोमीटर घुसून 9 दहशतवादी अड्डेच का उद्धवस्त केले. याच अड्ड्यांची निवड करण्याचे काय कारण होते याची माहिती आता समोर आली आहे.
- भारतीय सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानात 9 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास बारा अतिरेकी ठिकाणांवर हल्ला केला. हे टार्गेट पाकिस्तानच्या आत शंभर किलोमीटरपर्यंत होते. हल्ला करण्याआधी या ठिकाणांची खात्री करण्यात आली होती. नंतर त्यांना ट्रॅक करण्यात आले आणि एअर स्ट्राइक करुन पूर्ण उद्धवस्त करण्यात आले.
- भारताने ज्या दहशतवादी तळांना टार्गेट केले, त्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. तसेच लश्कर-ए-तैयबा आणि हिज्बूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांनाही नष्ट करण्यात आले. सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमध्ये झाला. बहावलपूर आंतरराष्ट्रीय बॉर्डरपासून शंभर किलोमीटर आत आहे. याच ठिकाणी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे मुख्यालय होते.
- याच पद्धतीने सांबा सेक्टरच्या हद्दीपासून 30 किलोमीटर आता मुरीदके नावाच्या भागात लश्कर-ए-तैयबाचा कॅम्प होता. हा कॅम्पही उद्धवस्त करण्यात आला. मुंबईवरील हल्ल्यातील अतिरेकी येथीलच होते. या ठिकाणी लश्कर-ए-तैयबाचे ट्रेनिंग सेंटर होते. अजमल कसाबने याच ठिकाणी ट्रेनिंग घेतले होते.
- भारतीय सैन्याने तिसरा हल्ला गुलपूर भागात केला. हा परिसर काश्मिरातील पूंछ राजौरीपासून 35 किलोमीटर दूर आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील दहशतवादी हल्ला आणि जून 2024 मध्ये प्रवाशांच्या बसवरील हल्ल्याचे मूळ येथेच होते.
भारत आरपारच्या तयारीत; दहशतवाद्यांचे ‘ते’ अड्डेही बेचिराख
