महाराष्ट्र
ब्रेकिंग! शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’

- राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत. आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. त्यातील एका गटाला अजित पवारांसोबत जावे वाटते, असे विधान पवारांनी म्हटले. तसेच एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावे, असेही पवार म्हणाले.
- पवारांनी नुकतीच इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाला वाटते की आम्ही एकत्र यावे, अजित पवारांसोबत जावे. तर दुसऱ्या गटाला वाटते की, अजितदादांसोबत जाऊ नये, असे पवार म्हणाले.
- संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचे की, विरोधी पक्षासोबत बसायचे, यांचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावे. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असेही पवार म्हणाले.



