ऑपरेशन सिंदूरनंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा डावा आखला होता. मात्र, भारताच्या सतर्क सैन्याने त्यांचा हा डाव उधळून लावला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अनेक शहरातील रडार यंत्रणावर हल्ला करते ते उद्धवस्त केले आहेत. त्यात पाकिस्तानी रडार यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याचे समजत आहेत. हे हल्ले भारताने ड्रोनच्या माध्यमातून केले. लाहोरमधील रडार यंत्रणाही भारतीय लष्कराने उद्धवस्त केले आहेत.
काल रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यांसारख्या अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानचे हे हल्ले भारताने निष्फळ केले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू ठेवला आहे. पाकिस्तानी गोळीबारात तीन महिला आणि पाच मुलांसह सोळा निरपराध लोकांचा बळी गेला आहे.
पाकिस्तान गोळीबारासह तोफांचा ही मारा सीमेवर करत आहेत. काल रात्री, भारतीय हवाई दलाच्या एस-400 सुदर्शन चक्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने भारताच्या दिशेने पाकिस्तानने सोडलेल्या मिसाईलवर गोळीबार केला. या कारवाईत मिसाईल निष्प्रभ करण्यात आले आहे.