ब्रेकिंग! पाकिस्तानला सर्वांत मोठा दणका

Admin
1 Min Read

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून आपला पाठिंबा व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पुतिन यांनी मोदींना फोन करून भारतातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप पर्यटकांच्या मृत्युबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

जयस्वाल यांनी X अकाउंटवर पोस्ट करत म्हटलंय की, पुतिन यांनी मोदी यांना फोन केला. भारतातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा दर्शविला. या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, यावर पुतिन यांनी भर दिला.

Share This Article