पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे. याचदरम्यान आज पाकिस्तानमध्ये अचानक आलेल्या भूकंपामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ एवढी मोजण्यात आली. आज दुपारी चार वाजता पाकिस्तानात ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) सांगितले. यापूर्वी १२ एप्रिल रोजी पाकिस्तानला ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता, असे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) एका निवेदनात सांगितले.