महाराष्ट्र
डोळ्यात अश्रू, काळजात राग घेऊन परीक्षा दिली

- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मस्साजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखनेही मोठे यश मिळवले आहे. वडिलांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रभर आंदोलन करणाऱ्या वैभवीने बारावीमध्ये मोठे यश संपादन करू तब्बल 85.33 टक्के गुण मिळवले आहेत.
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. या भयंकर हत्याकांडाने महाराष्ट्र सुन्न झाला होता. एकीकडे देशमुख यांच्या हत्येने कुटुंबीय हादरले असतानाच त्यांची कन्या वैभवी ही बारावीची परीक्षा देत होती. त्यामुळे तिच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बारावीच्या परीक्षेत वैभवीने 85.33 टक्के इतके मार्क्स मिळवले आहेत. वडिलांच्या मृत्यूचे आभाळाएवढे दुःख घेऊन वैभवीने परीक्षा दिली. या परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन केले. या निकालानंतर तिचे कौतुक होत आहे.



