महाराष्ट्र
ब्रेकिंग! भाजपचे पुन्हा धक्कातंत्र

- भाजपचे आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता मंत्री झाले आहेत. त्यांना थेट महसूलमंत्री पद देण्यात आले आहे. त्यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण होणार, असा प्रश्न विचारला जात होता.
- या प्रश्नाचे उत्तरही आता मिळाले आहे. मंत्रिमंडळातून डावलले गेलेले आमदार रवींद्र चव्हाण हेच प्रदेशाध्यक्ष होतील, असे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या नावाची फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी राहिले आहे. त्यांच्या नावाची घोषणा लगेच होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही.
- शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. डोंबिवली मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा विजयी झाले. चव्हाण अनुभवी आहेत.
- भाजप अंतर्गत वाद मिटवण्यातही ते मध्यस्थाची भूमिका बजावत असतात. यंदाही त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी चर्चा होती. परंतु, तसे काही घडले नाही. भाजपने यंदा मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
- भाजपचे आधीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे या निवडणुकीत विजयी झाले. भाजपाने त्यांना थेट महसूल खाते दिले.
- आता मिळालेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपचे प्रदेश अधिवेशन येत्या 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे होणार आहे.
- या अधिवेशनात चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार का याची उत्सुकता आहे. चव्हाण यांना आताच प्रदेशाध्यक्ष केले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळेल, असेही सांगितले जात आहे.