देश - विदेश
लोक पळाले, डोंगरावर गेले, जमीन हादरली, मशिदीतून घोषणा

- पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आहे. ही कारवाई भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे केली. या हल्ल्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. एका पाकिस्तानी व्यक्तीने प्रत्यक्ष पाहिलेले माध्यमांना सांगितले आहे.
- पाकिस्तानातील मुरीदकेमध्ये एका स्थानिक प्रत्यक्षदर्शीने सगळं सांगितले. या व्यक्तीने दहशतवादी छावण्यांवर हल्ला झालेले स्वत: पाहिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल बोलताना त्याने सांगितले की, चार ड्रोन पाहिले होते. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ अड्ड्यांवर अचूक हवाई हल्ले केले. रॉयटर्सशी बोलताना, पाकिस्तानी व्यक्ती म्हणाला, “रात्री सुमारे 12:45 वाजले होते, आम्ही झोपलो होतो. आधी एक ड्रोन आला. नंतर आणखी तीन ड्रोन आले आणि त्यांनी हल्ला केला. सगळं काही उद्ध्वस्त झाले.
- मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर रहिवासी त्यांच्या घरातून बाहेर पडले आणि डोंगराळ भागाकडे पळाले. शहरातील मशिदींमध्ये असणाऱ्या लाऊड स्पीकरमधून घोषणा सुरु झाल्या. लोकांनी घरातून निघून सुरक्षित ठिकाणी जावे, अशा सूचना देण्यात आल्या. एअर स्ट्राईक जमीन अनेकदा हादरली, असे त्याने सांगितले.



