देश - विदेश

ब्रेकिंग! चुन-चुनकर बदला लेंगे, अमित शहा प्रचंड आक्रमक

  • पहलगाम हल्ल्यानंतर भारतात दहशतवादाविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. या कृत्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाचे पथक जम्मू-काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहे. सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे ठिकाण, वेळ आणि पद्धत सर्व काही सैन्यच ठरवेल, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला आहे. ते म्हणाले, हे मोदींचे सरकार आहे, एक एक दहशतवाद्यांना शोधून त्यांचा नायनाट केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.   
  • मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक गोष्टीला कठोर प्रत्युत्तर दिले आहे, मग ते ईशान्येकडील राज्य असोत, डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांचे क्षेत्र असोत किंवा काश्मीरमधील दहशतवादाच्या कारवाया असो. आम्ही त्यांना कठोर प्रत्युत्तर दिले आहे. भ्याड हल्ला करून जर कोणी मोठा विजय मिळवला, असे समजत असेल, तर लक्षात ठेवा की हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, कोणालाही सोडले जाणार नाही.
  • या देशाच्या प्रत्येक इंच जमिनीतून दहशतवाद उखडून टाकणे हा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईल, असे शहा यांनी स्पष्ट केले. 

Related Articles

Back to top button