देश - विदेश
ब्रेकिंग! पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या चीनचा भारताकडून करेक्ट कार्यक्रम

- भारत व पाकिस्तानमध्ये सध्या संबंध चांगलेच ताणले आहेत. भारतासोबत युद्ध होण्याच्या स्थितीत सुरुवातीला चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे पाठवली. आता तुर्कस्थाननेही पाकिस्तानला हत्यारांची विमाने पाठविल्याच्या बातम्या आल्या आहेत. चीनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पाठवली. हे करत असताना चीनने भारताची नाराजी अंगावर घेतली. आता याच चीनला भारताने पहिला दणका दिला आहे.
- अमेरिकेच्या व्यापार युद्धात चीनवर मोठा कर लादण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या व्यापारात चीन फसल्याचे दिसत आहे. त्यातच अमेरिकेने त्यांचा पहिला व्यापारी करार भारतासोबत होऊ शकतो असे संकेत दिले आहे. जर असे झाले तर तो चीनसाठी मोठा धक्का समजला जात आहे. अमेरिकेचे आर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेच्या टॅरीफला टाळण्यासाठी अनेक देशांनी खूप चांगले प्रस्ताव दिले. मात्र आमचा सर्वात आधी करार हा भारतासोबत होऊ शकतो. स्कॉट बेसेंटचे हे वक्तव्य चीनच्या टेन्शनमध्ये वाढ करणारे आहे.
- स्काॅट बेसेंट यांच्या या वक्तव्याचा फटका चीनला चांगलाच जिव्हारी लागणारे आहे. कारण अमेरिकेकडून चीनवर प्रचंड टेरीफ लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने भारतासोबत करार केल्यास चीनच्या भारतातील बाजारपेठेला मोठा फटका बसू शकतो. चीनचा खूप मोठा व्यापार हा अमेरिकेवर अबलंबून आहे. मात्र आता अमेरिका जर भारतासोबत पहिला करार करणार असेल तर चीनच्या बाजारपेठेवर त्याचा नक्कीच प्रभाव पडणार आहे.



