देश - विदेश
बिग ब्रेकिंग! महाराष्ट्रातील तरुणाची दहशतवाद्यांशी भेट

- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधी आपण हल्लेखोरांच्या संपर्कात आलो होतो, असा दावा जालना येथील एका तरुणाने केला आहे. आदर्श संजय राऊत असे या तरुणाचे नाव असून त्याने हल्लेखोरांचे ‘रेकीचित्र’ प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेला ई-मेलद्वारे माहिती कळवली आहे.
- राऊत हा काश्मीर दौऱ्यावर असताना पहलग्राम येथील व्ह्यूपॉईंटजवळ थांबला होता. तो छायाचित्रे घेत असताना, जवळच्या एका दगडी बांधकामाआडून पाच-सहा जण त्याच्या दिशेने आले. त्यांनी आदर्शला, “आप काश्मिरी हो क्या? हिंदू हो क्या? आप यहाँ के नही लगते” असे प्रश्न विचारल्याचा दावा आदर्शने केला आहे. त्यावर आदर्शने “नही, मै यहाँ का ही हूँ” असे काहीसे उत्तर दिल्याचे सांगितले जाते.
- या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी, याच परिसरात दहशतवादी हल्ला झाला. आदर्शने ज्या व्यक्तींशी संवाद साधला. तेच या हल्ल्यात सामील असावेत, असा संशय व्यक्त होत आहे. आदर्शच्या वडिलांनी प्रसिद्ध झालेले रेकीचित्र पाहिल्यानंतर आदर्शला त्या व्यक्तींबाबत विचारले असता त्याने त्यांना ओळखल्याचे सांगितले.
- २९ एप्रिलला सकाळी श्रीनगर येथे असताना आदर्शला पहलग्राममधील हल्ल्याची माहिती मिळाली, ज्यामुळे सर्व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर बुधवारीहल्लेखोरांचे रेकीचित्र प्रसिद्ध झाल्यावर आदर्श आणि त्याच्या वडिलांनी त्या व्यक्तींना ओळखले. आदर्शच्या वडिलांनी तत्काळ एनआयएला ई-मेलद्वारे संपर्क साधून आदर्शसोबत घडलेला प्रसंग आणि संशयित व्यक्तींबाबत माहिती दिली. आदर्श त्यावेळी श्रीनगरहून मुंबईमार्गे रेल्वेने जालन्याकडे परत येत होता.
- एनआयएकडून या ई-मेलची पडताळणी सुरू असतानाच बुधवारीच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी राऊत कुटुंबीयांशी संपर्क साधून यासंदर्भात प्राथमिक माहिती घेतल्याचे समजते.



