सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद

-
सध्या सोलापूर जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान आज सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक तापमानाची (44.1 अंश) नोंद झाली आहे. दरम्याननागरिकांनी दुपारच्या वेळात घराबाहेर पडू नये. घराबाहेर जाताना पाणी सोबत ठेवावे, शिवाय छत्री, टोपी घेऊन जावे, कोणतीही हयगय करू नये, असे हवामान खात्याने म्हटले आहे.