देश - विदेश
मंगळवारचा दिवस आणि तो पॅटर्न

- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूप बिघडले आहेत. दरम्यान बैसरनसह खोऱ्यातील इतर ठिकाणेही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. तर दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी २२ एप्रिलचा दिवस निवडण्यामागे विशेष कारण होते, असेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आली नाही.
- दहशतवाद्यांकडून हल्ल्यासाठी मंगळवार, २२ एप्रिलच दिवस निवडण्यामागचे कारण टाइम्स नाऊच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्व आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी हा दिवस निवडला, असे सांगण्यात येत आहे. मात्र, भारतीय लष्कर किंवा तपास यंत्रणा तसेच सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
- रिपोर्टनुसार, पहलगामसह इतर तीन ठिकाणे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. त्यात अरू खोरे आणि बेताब खोऱ्याचाही समावेश आहे. मात्र, अन्य दोन ठिकाणांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याने दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी बैसरन हे ठिकाण निवडले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांकडून हल्ल्याची आधीच तयारी करण्यात आली होती. पहलगाम आणि परिसराची या दहशतवाद्यांनी १५ ते २० दिवस आधीच रेकी केली होती. याशिवाय दहशतवाद्यांकडून बैसरन खोऱ्यातील हालचालींवर पाळत ठेवून होते. सूत्रांनुसार, घटनास्थळी कधी गर्दी होते याबाबतची माहितीही दहशतवाद्यांनी मिळवली होती.