देश - विदेश

ब्रेकिंग! पाकिस्तानी सैन्याचे कमकुवत बाजू काय? मोठा क्यू मिळाला

  • पहलगामध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवर एक विधान समोर आले आहे.
  • हे विधान कोणत्याही राजकारणी किंवा सुरक्षा विश्लेषकाचे नाही, तर हे विधान आहे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचे. शाहिद आफ्रिदीने स्पष्टपणे म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्य आधीच युद्धासारख्या परिस्थितीत आहे. कारण पाकिस्तानी सैन्य सध्या देशातच अनेक गोष्टींना तोंड देत आहे.
  • बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेचा उल्लेख करताना आफ्रिदीने हे वक्तव्य केले आहे. आफ्रिदी म्हणाला, परिस्थिती खूप गंभीर आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान सारख्या दहशतवादी संघटनांच्या सततच्या हल्ल्यांमुळे सैन्याचे आधीच नुकसान होत आहे.
  • शाहिद आफ्रिदीच्या या विधानावरून पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती काय आहे हे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानी सैन्य सध्या अंतर्गत बंडखोरी, फुटीरतावादी चळवळ आणि दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत आहे. या परिस्थितीत, ते बाहेरच्या संकटांना (भारताशी संभाव्य युद्ध) तोंड देण्याच्या स्थितीमध्ये नाहीत.

Related Articles

Back to top button