क्राईम

पोलिसाचे अश्लिल कांड

  • छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत पोलीस निरीक्षकाने आक्षेपार्ह वर्तन केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याने मात्र आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.
  • महिला अंमलदाराचा आरोप –
  • या प्रकरणी एका ३४ वर्षीय महिला अंमलदाराने बेगमपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, ९ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजता त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर संपर्क साधण्यात आला व एक छायाचित्र पाठवण्यात आले. मात्र, ते छायाचित्र पाठवणाऱ्याने (आरोपाप्रमाणे निरीक्षक अशोक भंडारे लगेचच डिलीट केले.
  • पीडित अंमलदाराने हा क्रमांक कोणाचा आहे, अशी विचारणा केली असता, त्यांना कथितरीत्या आक्षेपार्ह संदेश मिळाला. त्यानंतर पुन्हा तेच छायाचित्र पाठवून आणखी एक आक्षेपार्ह संदेश पाठवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशोक भंडारे हे आपले आपले प्रभारी अधिकारी नसतानाही त्यांनी रात्री उशिरा संपर्क साधून छायाचित्रे व संदेश पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असा आरोप पीडितेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button