महाराष्ट्र

ब्रेकिंग! देशावर मोठे संकट, भारत पाकिस्तान युद्ध होणार?

  • सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत पून्हा संघर्षाचा वणवा भडकला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच संदर्भात भेंडवळच्या घट मांडणीत मोठं भाकीत करण्यात आले आहे. हे भाकीत सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तवले आहे.
  • भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण स्थिती राहणार असल्याचे भाकीत भेंडवळच्या घटमांडणीत वर्तविण्यात आले. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर ही घटमांडणी करण्यात येते. बुलढाण्यात अक्षय तृतीयेला घटमांडणी केली जाते. यंदा याच घटमांडणीतून देशावर मोठं संकट, राजकीय तणाव अन् युद्धजन्य परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच राज्यामध्ये पावसाची अन् शेतीची स्थिती देखील अनिश्चित राहील, असे सांगितले गेले.
  • साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत भेंडवळ येथे मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. देशावर वर्षभर युद्धाचे सावट राहील, परंतु युद्ध होणार नाही. राजा म्हणजेच देशाचे पंतप्रधान तणावात राहतील. पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल. सोबतच पाणी अन् पावसाची अनिश्चितता राहील, असे भाकीत करण्यात आले आहे. 
  • पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी भेंडवळची परांपरा आहे. ऐतिहासिक आणि मोठं संस्कृतिक महत्व असलेल्या भेंडवळची अक्षय्य तृतीय्येला घटमांडणी होते अन् दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवले जाते. आज सकाळी सूर्योदय होण्याआधी भेंडवळचे भाकीत वर्तवण्यात आले. भेंडवळ येथील भाकितानुसार, यंदा पावसाची स्थिती सर्वसाधारण राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल.

Related Articles

Back to top button