देश - विदेश
पहाटे दोन वाजता रंगला थरार!

- भारतीय हवाई दलाची विमाने आज पहाटे परत पाठविल्याचा दावा पाकिस्तानच्या हवाई दलाने केला आहे. काही वृत्तानुसार भिंबर व कोटली सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घिरट्या घालणारे दोन भारतीय क्वाडकाँप्टर पाडल्याचा दावाही करण्यात आला आहे. पाकिस्तानचा हा दावा खरा की खोटा, याबाबत अद्याप भारतीय लष्कराकडून काही अपडेट देण्यात आलेली नाही.
- भारतीय लष्कर हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती पाकिस्तानी सैन्याला बुधवारी समजली. भारत येत्या २४ ते ३६ तासांत हल्ला करेल, ही बातमी पाकिस्तानमध्ये वादळासारखी पसरली. त्यानंतर आज पहाटे दोन वाजता भारतीय हवाई दलाच्या चार राफेल लढाऊ विमानांना पाकिस्तानने परत पाठवले, असा दावा पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांनी केला.
- काही वृत्तांमध्ये पाकिस्तानच्या भिंबर व कोटली सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घिरट्या घालणारे दोन भारतीय क्वाडकाँप्टर पाडण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.