देश - विदेश
शाहिद आफ्रिदीचे भारतीय सैन्याबद्दल अपशब्द

- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत कधीही हल्ला करु शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यामुळे अनेकजण भारतीय सैन्याविरोधात वादग्रस्त विधान करताना दिसत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील भारतीय सैन्यविरोधात वादग्रस्त विधान केल्याने आफ्रिदीवर चारही बाजूने टीका होत आहे. तर आता भारतीय क्रिकेटचा ‘गब्बर’ शिखर धवनने आफ्रिदीला प्रत्युत्तर दिले आहे. आणखी किती खालची पातळी गाठणार? असा प्रश्न विचारात पाकिस्तान आणि आफ्रिदीला भविष्यात यश मिळवण्यासाठी मेंदूचा वापर करावा, असा सल्ला देखील धवनने दिला आहे.
- ‘एक्स’ वर धवन म्हणाला की, आम्ही तुम्हाला कारगिलमध्येही हरवले आहे, तुम्ही आता आणखी किती खालची पातळी गाठणार? आफ्रिदीने भारताबद्दल बोलण्यापेक्षा पाकिस्तानाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत करावा. आम्हाला भारतीय सैन्यावर अभिमान आहे. भारत माता की जय, जय हिंद, असे प्रत्युत्तर धवनने आफ्रिदीला दिला आहे. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना आफ्रिदीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय सैन्याला जबाबदार धरले होते.