देश - विदेश

पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित

  • पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रियाही येत आहे. अशातच पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारताची हार निश्चित आहे, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार युडी मिंझ यांनी केले आहे.
  • या दरम्यान त्यांच्यावर मोठी टीका होत असून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान मिंझ यांनी आपल्या विधानावर आता सारवासारव केली आहे.
  • दरम्यान आपले अकाऊंट हॅक झालेले आहे, त्यावर कोणतीही पोस्ट अथवा विचार व्यक्त होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करावे, असे म्हणत मिंड यांनी झालेल्या प्रकाराबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
  • जर भारत पाकिस्तानसोबत युद्ध करणार असेल तर भारताचा पराभव निश्चित आहे, अशी पोस्ट युडी मिंझ यांच्या फेसबूक अकाऊंटवर होती. नंतर ती पोस्ट डिलिट झाली आहे. मिंझ यांच्या पोस्टमध्ये उल्लेख होता की, आज पाकिस्तानविरुद्ध निर्णायक युद्धाची भाषा जे लोक करत आहेत, त्यांनी समजून घ्यावे की, यावेळी भारताला पाकिस्तानसह चीनशीही लढावे लागेल. मग अशा परिस्थितीत भारताचा पराभव निश्चित आहे.

Related Articles

Back to top button