क्राईम
गाडीचा हॉर्न वाजवल्यावरुन पुण्यात राडा

- पुण्यातून मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षरश: कपडे काढून एका माणसाने समोरच्याला बेदम मारले. काही वेळाने या मारहाणीत आणखी लोक सामील झाले आणि पुण्यात भर रस्त्यात राडा झाला. एका क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुफान मारहाण झाली.
- मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचे हॉर्न वाजवण्यावरून पुण्यात दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. रस्त्यावरून जात असताना गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून या मंडळींनी एकमेकांना जबर मारहाण केली. पुण्यातील भवानी पेठेतून ही घटना समोर आली आहे. या प्रकरणात पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- दरम्यान प्राथमिक चौकशीनुसार, रस्ता क्रॉस करत असताना दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवल्याच्या कारणाने ही मारहाण झाली आहे. या प्रकरणात खडक पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.