- सोलापूर : सध्या उन्हाळ्याची तीव्रता भयंकर आहे. महापालिकेकडून पाणी पाच दिवसाला एकदा येते. त्यामुळे माणसाला पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. या परिस्थितीत मुक्या जनावरांची काय अवस्था होत असेल. याची कल्पना सुद्धा करवत नाही. अशावेळी वीरशैव व्हिजनतर्फे मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या जबाबदारीसह जलकुंभांचे वाटप करणे हे महत् कार्य आहे असे प्रतिपादन उद्योगपती संजय शरणार्थी यांनी केले.
- वीरशैव व्हिजनतर्फे मुक्या प्राण्यांसाठी जलकुंभांचे वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी बिल्डर व डेव्हलपर मल्लिकार्जुन खेड, सराफ व्यापारी संतोष शेटे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते.
- प्रतिवर्षी बसव जयंती निमित्त वीरशैव व्हिजन तर्फे 10 जलकुंभांचे पाण्याच्या जबाबदारीसह वाटप करण्यात येते. कै. मुत्यापा बिराजदार यांच्या स्मरणार्थ अडत व्यापारी संगमेश्वर बिराजदार हे प्रतिवर्षी 10 जलकुंभ उपलब्ध करून दिले आहेत. यावेळी अशोक मुलीमनी (कर्णिक नगर), दर्बी क्लॉथ सेंटर (नवी पेठ), श्रीशैल कलशेट्टी (अक्कलकोट रोड), श्री सिद्धेश्वर वुमेन्स वसतिगृह (विश्रांती चौक), लोहार दहिटणे यांना पाण्याच्या जबाबदारीसह देण्यात आले.
- यावेळी विश्वस्त सोमेश्वर याबाजी, सचिव नागेश बडदाळ, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोमनाथ चौधरी, सिद्धेश्वर कोरे, अशोक मुलीमनी, प्रवीण कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मुक्या प्राण्यांची सेवा महत् कार्य : संजय शरणार्थी
