जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती मिळाली आहे. दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसाचा पाकिस्तानी सैन्याशी थेट संबंध आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, हाशिम मुसा दहशतवादी बनण्याआधी पाकिस्तानी सैन्यात पॅरा कमांडो होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, हाशिम मुसाच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने मिळून मुसाने पहलगाम दहशतवादी हल्ला प्रत्यक्षात आणला. मुसाला लश्कर-ए-तैयबाने प्रशिक्षण देऊन कश्मीरला पाठवले होते. मुसाने इथे येऊन तीन स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने संपूर्ण घटना प्रत्यक्षात आणली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोणाला संशय येऊ नये यासाठी पहलगाम हल्ल्याच्यावेळी मुसा आणि त्याच्या साथीदारांनी आर्मीचा ड्रेस परिधान केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी त्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदा पर्यटकांवर इतका मोठा हल्ला झाला.