देश - विदेश

ब्रेकिंग! भारतीय लष्कराला मोठे यश

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याबाबत भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला आहे. भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरले असल्याचे वृत्त आहे. सहा दहशतवाद्यांना घेरण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून काढण्यात आले आहे. काश्मीरमधील जंगलात लपलेल्या या हल्लेखोर दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेरले आहे. त्या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. परंतु, ही चकमक नेमकी कुठं सुरु आहे, त्याबाबत अजून माहिती मिळाली नाही. पहलगाव हल्लामागे दहशतवादी हाशिम मूसाचा हात असल्याचे पुरावे भारतीय तपास संस्थांना मिळाले आहे. मूसा हा पाकिस्तानी नागरिक आहे. तो स्पेशल फोर्सेजचा पूर्व कमांडो आहे. त्याला पाकिस्तानच्या स्पेशल सर्विस ग्रुपकडून विशेष प्रशिक्षण मिळाले आहे. त्यानंतर तो लश्कर-ए-तैयबामध्ये सक्रीय झाला.

पहलगाम हल्ल्यातील दहशवादी अद्याप पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पोहचले नाही. त्या दहशतवाद्यांचा शोध गेल्या आठवडाभरापासून सुरु होता. आज ते दहशतवादी काश्मीरच्या जंगलांमध्ये सापडले. त्यानंतर सर्व सहा दशतवाद्यांना लष्कराने घेरले आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे दहशतवाद्यांना वाहन वापरणे शक्य नव्हते. यामुळे हे दहशतवादी चालतच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जात होते.

लष्कराला मिळालेल्या माहितीनंतर सर्व दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले आहे. घटनास्थळी गोळीबार सुरु आहे. या दहशतवाद्यांकडे शस्त्रे असल्यामुळे त्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरु केला आहे. 

Related Articles

Back to top button