देश - विदेश
‘तो’ अल्ला हू अकबर ओरडला अन् खाली दहशतवाद्यांचा गोळीबार

- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या स्थळावरील विविध पर्यटकांनी केलेल्या व्हिडिओतून एक- एक सत्य समोर येऊ लागले आहे. एका व्हिडिओमध्ये “अल्ला हू अकबर” घोषणा देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला राष्ट्रीय तपास संस्था आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा बोलावले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
- पहलगाम हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक पर्यटकांसह स्थानिक लोकांची एनआयएच्यावतीने चौकशी केली जात आहे. सर्वाना समन्स बजावून नेमकी घटना कशी झाली, त्यावेळी तुम्ही कुठे होतात, यासह अनेक बाजूंचा तपास केला जात आहे.
- त्यातच आता ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली. त्या ठिकाणी असलेल्या झिपलाइन ऑपरेटरला आता पुन्हा बोलावण्यात आले आहे. तपास यंत्रणा आणि पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. त्याचे दुसरे कारण म्हणजे, ऋषी भट्ट नावाच्या व्यक्तीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुढे आल्यानंतर त्यामध्ये सदर ऑपरेटर हा घोषणा देत होता. तर त्याच्या घोषणेनंतरच गोळीबाराला सुरूवात झाली, असा दावा केला जात आहे.
- ऋषीने सांगितले की, एका झिपलाइन ऑपरेटरने “अल्ला हू अकबर” असे ओरडले आणि त्यानंतर लगेचच गोळीबार सुरू केला. ते झिपलाइनवर चढण्यापूर्वी त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर चार जण आधीच सुरक्षितपणे गेले होते.



