देश - विदेश
केंद्र सरकारकडून हवाई दलाला आदेश

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर हे सज्ज झाले आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात बैठकींचे सत्र सुरू आहे.
काल फ्रान्स आणि भारतामध्ये राफेल खरेदीसाठी 63,000 हजार कोटींचा करार झाला. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या सीमेवर हालचाली वाढल्याने भारतीय हवाई दलाला दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिति निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येने तोफा आणण्यात आल्या आहेत.



