देश - विदेश

मोठी बातमी! भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तान घाबरला

  • पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल करार रद्द केला तसेच भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देत त्यांचे व्हिसा रद्द केले आहे. 
  • तर आता भारत सरकार लष्करी पर्यायचा विचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यापूर्वीच पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत कधीही हल्ल करु शकतो, अशी शक्यता पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीमध्ये वर्तवली आहे.
  • भारत हल्ला करणार या भीतीमुळे पाकिस्तानचे सैन्य अलर्ट मोडवर ठेवले आहे. भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो असं पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी सोमवारी रॉयटर्सशी बोलताना सांगितले. आम्ही आमच्या सैन्याला बळकटी दिली आहे कारण ही एक संभाव्य घटना आहे जी आता घडणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, म्हणून ते निर्णय घेण्यात आले आहेत, असे या मुलाखतीमध्ये आसिफ म्हणाले.

Related Articles

Back to top button