सोलापूर ब्रेकिंग! बातमी देऊन तुझी बदनामी करतो म्हणत मागितली खंडणी

Admin
1 Min Read
  • सोलापूर : सिद्धेश्वर नगर येथे वारंवार फोन करून तुझी दैनिकांमध्ये बातमी देऊन बदनामी करीन त्याबद्दल तू मला पाच लाख रुपये दे म्हणत वारंवार मानसिक त्रास दिल्याची घटना 5 ते 10 एप्रिलपर्यंत घडली. याप्रकरणी पाणीसा जहर बोरामणीकर (वय-45, रा.सिद्धेश्वर नगर भाग चार मजरेवाडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मुनीर शेख (रा.नवीन विडी घरकुल), यास्मिन मुजाहिद शेख आणि जहर अब्दुलगणी बोरामणीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
  • यात अधिक माहिती अशी की, यातील संशयित आरोपींनी संगनमत करून संशयित आरोपी मुनीर शेख यांनी फिर्यादीस वारंवार फोन करून तुझी दैनिकात बातमी देऊन बदनामी करेन त्याबद्दल तू मला पाच लाख रुपये दे अशी मागणी केली. तसेच संशयित आरोपी यास्मिन शेख हिने मोबाईलवर फोन करून तुझ्या पतीसोबत भांडण मिटवून घे नाहीतर मी तुझी चैनलला बातमी लावून बदनामी करते असे म्हणून फिर्यादीचे पती संशयित आरोपी जहूर बोरामणीकर यांनीही सांगितल्याप्रमाणे आम्हाला पाच लाख रुपये दे नाहीतर बातमी द्यायला सांगून बदनामी करून तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Share This Article