जगात शांतता नांदताना दिसत नाही. जिकडे तिकडे संघर्ष आणि संघर्षच आता दिसून येत आहे. संघर्षाच्या आगीत जगाची मध्यपूर्व दिशा जळताना दिसत आहे. एकीकडे इराणमध्ये शक्तिशाली स्फोट झाले असून मिसाईल बनवणारे रसायन नष्ट करण्यात आले आहे तर दुसरीकडे इस्त्रायलने लेबनानवर शक्तीशाली हवाई हल्ला केला आहे. हे काही कमी असतानाच अमेरिकाही हुती विद्रोह्यांवर बाँम्बवर्षाव करत आहे.
इराणमधील बंदर अब्बास शहरातील शाहिद राजाई बंदरात भीषण स्फोट झाला. यात 40 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे तर जवळपास चारशेहून अधिक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
लेबनान आणि इराण यांच्यासोबत एकाचवेळी इस्त्रायलने पंगा घेतला आहे. तर दुसरीकडे गाझापट्टीतही इस्त्रायलचा संघर्ष सुरु आहे. रविवारी लेबनानची राजधानी बेरुतच्या दक्षिण भागात इस्त्रायलने हवाई हल्ला केला. दरम्यान यमनमधील हुती विद्रोहींना अमेरिकेने लक्ष्य केले आहे. हुती विद्रोहींना अमेरिका जवळपास 15 मार्चपासून लक्ष्य करीत असून यमनमधील सुमारे आठशे जागी हल्ले केले आहेत. आतापर्यंतच्या हल्ल्यात जवळपास शेकडो हुती नेता आणि त्यांचे लोक मारले गेले.