क्राईम
लेक कलेक्टर झाली! आनंद गगनात मावेना

- मुलगी आयएएस झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचे हृदयद्रावक निधन झाल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे घडली. लेक कलेक्टर झाल्याच्या आनंदोत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे. प्रल्हाद खंदारे असे मृत्यू झालेल्या बापाचे नाव आहे. खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.
- प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकरी म्हणून निवड झाली. मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून साजरा केला जात असताना खंदारे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मुलीच्या आयएएस अधिकारीपदी झालेल्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या खंदारे परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



