पहलगाम हल्ल्यानंतर या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेच्या तपासांतर्गत तपास यंत्रणांना चीनच्या एका संशयास्पद सॅटेलाईट फोनचा मागोवा लागला आहे. तपास यंत्रणांना चीनच्या एका ‘हुआवेई सॅटेलाइट फोन’चा तपास लागला आहे. पहलगाम हल्ल्यावेळी हा फोन घटनास्थळावर होता, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुआवेई ही चीन कंपनी आहे. या कंपनीच्या उपग्रह उत्पादनावर भारतात बंदीही घालण्यात आली आहे. घटनेवेळी हा फोन पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही परदेशी स्त्रोताच्या माध्यमातून भारतात आल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे. २२ एप्रिलला ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी या फोनवरून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी चार वेळा संपर्क साधण्यात आला होता. पण घटनास्थळी मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असल्याने हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला नाही. हल्ल्यापूर्वी आणि त्यादरम्यान किमान दहा लोक एन्क्रिप्टेड ॲंपद्वारे त्यांच्या हँडलरशी गप्पा मारत होते आणि त्यांना कॉल करत होते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.