देश - विदेश
भारताचा मास्टरस्ट्रोक! फ्रान्सकडून घेणार 63 हजार कोटींची राफेल विमाने

- पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांनी युद्धाची तयारी केली आहे. पाकिस्तानला चीन व नंतर तुर्कीने हत्यारे व क्षेपणास्त्र पुरविली. आता भारतानेही एक पाऊल उचलत फ्रान्ससोबत 26 राफेल मरीन विमानांची डील करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ही डील पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये हा करार होईल. त्यानुसार, भारत फ्रान्सकडून २२ सिंगल सीटर विमाने आणि ४ डबल सीटर विमाने खरेदी करणार आहे.
- भारत आणि फ्रान्सच्या संसक्षण मंत्र्यांमध्ये आज एक करार होणार आहे. त्यानुसार भारत फ्रान्सकडून २६ विमाने घेणार आहे. ही विमाने अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील. वृत्तानुसार फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे ६३,००० कोटी रुपयांना होत आहे. भारत आणि फ्रान्सच्या संसक्षण मंत्र्यांमध्ये आज एक करार होणार आहे. त्यानुसार भारत फ्रान्सकडून २६ विमाने घेणार आहे. ही विमाने अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील. वृत्तानुसार फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे ६३,००० कोटी रुपयांना होत आहे.
- राफेल मरीन हे नौदलाच्या विमानवाहू जहाजात वापरले जाईल. ते ५०.१ फूट लांबीचे असून त्याचे वजन १५ हजार किलोपर्यंत आहे. त्याची इंधन क्षमता ११,२०२ किलो आहे. ज्यामुळे ते जास्त वेळ उडू शकते. हे एकल आणि दुहेरी आसनी विमान ५२ हजार फूट उंचीवर पोहोचू शकते.
- या विमानाचे फोल्डिंग पंख देखील खूप मजबूत आहेत. वेग ताशी २२०५ किमी आहे. हे विमान फक्त एका मिनिटात १८ हजार मीटर उंची गाठू शकते. ते पाकिस्तानच्या एफ-१६ आणि चीनच्या जे-२० पेक्षा चांगले आहे. ते उड्डाण केल्यानंतर ३७०० किमी अंतरापर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहे.