देश - विदेश

पाकिस्तानच्या मदतीला पहिला देश मैदानात

  • भारत व पाकिस्तानमध्ये सध्या संबंध चांगलेच ताणले आहेत. भारतासोबत युद्ध होण्याच्या स्थितीत सुरुवातीला चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे पाठवली. आता तुर्कस्थाननेही पाकिस्तानला हत्यारांची विमाने पाठविल्याच्या बातम्या आल्या आहेत. तुर्कीतून शस्त्रे घेऊन जाणारी मालवाहू विमाने इस्लामाबादला पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जेव्हा तुर्कस्थानमध्ये भुकंप झाला तेव्हा त्यांना सगळ्यात पहिली मदत भारताने केली होती. मात्र तुर्की कृतघ्न निघाला.
  • रविवारी शस्त्रास्त्रे घेऊन जाणारे तुर्की हवाई दलाचे C-130 हरक्यूलिस लष्करी वाहतूक विमान कराचीत दाखल झाले. काही सूत्रांनुसार तुर्कीहून किमान ६ सी-१३० मालवाहू लढाऊ विमाने इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. कराची व्यतिरिक्त इस्लामाबादमधील लष्करी तळावर ६ सी-१३० विमाने उतरल्याचे वृत्त आहे. एकट्याने भारताचा सामना करू शकत नसलेल्या पाकिस्तानला तुर्कीचा पाठिंबा देत आहे. तुर्की आणि पाकिस्तान दोघांनीही शस्त्रास्त्रांच्या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे.
  • भारत पाकिस्तानवर हल्ला करेल, अशी शक्यता वाढली आहे. अशा काळात चीन व तुर्की पाकिस्तानच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी चीनने पाकिस्तानला पीएल-१५ क्षेपणास्त्रे पाठवली होती. ती क्षेपणास्त्रे पाकिस्तानने त्यांच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांमध्ये बसवली आहेत. आता तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पाठवल्याचे सांगितले जात आहे. तुर्कीने पाकिस्तानला पाठवलेल्या शस्त्रांमध्ये बायरक्तार टीबी२ ड्रोन, लहान शस्त्रे, स्मार्ट बॉम्ब आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान आणि तुर्की यांच्यात शस्त्रास्त्रांबाबतचे करार आधीच झाले आहेत.

Related Articles

Back to top button