ब्रेकिंग! इतिहास माहिती नसताना स्वातंत्र्य सैनिकांबाबत बोलू नका

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले आहे. तसेच कोर्टाने राहुल यांना जारी करण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या अलाहाबाद हायकोर्टच्या आदेशांना स्थगिती दिली आहे. तसेच कोर्टाने सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींना महात्मा गांधींनाही इंग्रजांचे नोकर म्हणणार का? असा सवाल करत फटकारले आहे.
2022 मध्ये भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, सावरकर हे इंग्रजांचे नोकर होते. त्यावरून त्यांच्यावर कोर्टात खटला दाखल आहे. त्यावर पुन्हा एकदा न्यायमुर्ती दिपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. त्यांनी राहुल यांना याबाबत फटकारले आहे.
ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले त्यांच्याबाबत तुम्ही असे वक्तव्य करता? महाराष्ट्रात सावरकरांची पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही हे असेच वक्तव्य करत राहाल तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. स्वातंत्र्य सैनिकांबाबत असे कोणतेही वक्तव्य खपून घेतले जाणार नाही. जर इंग्रजांना पत्र व्यवहार करण्यावरून सावरकरांना तुम्ही इंग्रजांचे नोकर म्हणता तर महात्मा गांधी देखील व्हाईसरॉयला पत्र लिहित होते. त्यांना देखील इंग्रजांचे नोकर म्हणणार का? तसेच तुमच्या आजी इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना सावरकरांचे कौतुक करणारे पत्र दिले होते.