सोलापूर
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट

- सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे- माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आरोपी मनीषाला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती तपासाधिकाऱ्यांनी केली होती. पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचे हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडी देण्याची तपासअधिकाऱ्यांची न्यायालयात मागणी केली होती.
- सरकारी पक्षाची बाजू ऐकत मुख्य न्यायादंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी मनीषाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. डॉ. वळसंगकर आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असून हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषाच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिस तपास सुरू आहेत.
- याशिवाय फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर, शोनाली वळसंगकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून लवकरच डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.