देश - विदेश
भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा, त्यांना शोधून शोधून परत पाठवा

- पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर आता सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पाश्वभमीवर गृहमंत्रालयाने आज आणखी एक निर्णय घेतला. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आज गृहमंत्रालयाने एक पत्र पाठवले. त्यानुसार आपापल्या अधिकारक्षेत्रातील पाकिस्तानी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठविण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे समजते.
- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पाच महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द केल्याचे आदेशही देण्यात आले होते. २७ एप्रिलपासून भारतातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द केले जाणार आहेत. सरकारने सांगितले की वैद्यकीय व्हिसा केवळ अतिरिक्त ४८ तासांसाठी वैध असेल.
- भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा आणि त्यांना परत पाकिस्तानात पाठवा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी वैयक्तिकरित्या याबाबत चर्चा केली आहे.