देश - विदेश
ब्रेकिंग! पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच

- पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्याने संपू्र्ण देश हादरला आहे. भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत. असे असले तरी एका मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खरं काय ते बोलून गेलेच.
- भारतात झालेल्या एखाद्या दहशतवादी कृत्यामागे अनेकदा पाकिस्तानच असतो. हा इतिहास आहे. मात्र, तरीही पाकिस्तान प्रत्येकवेळी हे आरोप खोडून काढत असतो. त्याचप्रमाणे पहलगाम दहशतावादी हल्ल्याचा आरोपही पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी खोडून काढला. एवढेच नाही तर याचा दोष, भारतातीलच असंतुष्ट गटांवर टाकला होता. पण, सत्य फार काळ लपून राहात नाही, हेच खरे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे मान्य केले.
- प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एका मुलाखतीत आसिफ यांना प्रश्न विचारण्यात आला की, दहशतवादी संघटनांना अर्थसहाय्य करणे तसेच त्यांना प्रशिक्षण देणे, हा पाकिस्तानचा इतिहास आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? त्यावर आसिफ म्हणाले की, अमेरिका, ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी गेल्या 3 दशकांपासून हे काम आम्ही करत आहोत. ती आमची चूक होती आणि आता आम्ही त्याचे परिणाम भोगत आहोत.