क्राईम
ब्रेकिंग! आरोपीला आता थेट फाशीच

- स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पहाटे घडलेल्या या अमानुष प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा शोध घेण्यासाठी आठ पोलिस पथके रवाना झाली आहेत.
- या प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
- अजितदादा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पोलिसांना तक्रार मिळताच तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे.
- सीपींसोबत माझे बोलणे झाले आहे. आरोपी हा शिरूर तालुक्यातील असल्याची माहिती आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले आहे, मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून शिरूर आणि त्याच्या गावी शोधमोहीम सुरू आहे. या घटनेने मला अतिशय मनस्ताप झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हे असह्य आहे. आरोपी कोणत्याही परिस्थितीत सापडला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजितदादा यांनी ठामपणे सांगितले.