महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांची तुलना थेट औरंगजेबाशी, शिंदे संतापले!

- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट क्रूर शासक औरंगजेब याच्याशी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संताप व्यक्त केला. सपकाळ यांनी फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, असा सवाल शिंदे यांनी केली. शिंदे यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
- सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केले म्हणून त्यांनी फडणवीसांची तुलना थेट औरंगजेबाशी केली. औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, असा पलटवार शिंदे यांनी केला.
- औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे अशीच लोकांची भावना आहे, असेही शिंदे म्हणाले.