बिजनेस
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ!

- सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या वाढत्या दरामुळे गुंतवणूकदारांना बँकेच्या व्याजदरापेक्षा सोन्याच्या दरात मोठा परतावा मिळत असल्याचे दिसून येते. सोन्याचे वाढते दर पाहता अनेकांनी बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा सोन्याचे नाणे खरेदी करून सोन्यात गुंतवणूक करण्यात समाधान मानले आहे.
- प्रतितोळा (दहा ग्रॅम ) सोन्यासाठी 88 हजार रूपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणे हे गरिबांचे काम राहिले नाही. गेल्या तीन महिन्यांत सोन्याच्या दरात 15 हजार रूपयांची वाढ झाली आहे. तर वर्षभरात तब्बल 22 हजार रूपयांची वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोन्याकडे वळाले आहेत. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन त्याचा परिणाम किंमतीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
- गेल्यावर्षी जीएसटीसह प्रतितोळा सोन्याचा दर 76 हजार रूपये होता. तोच सोन्याचा दर जीएसटीसह आज 91हजार रूपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात 22 हजार रूपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भविष्यातही सोन्याचे दर वाढतच राहतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.